लातूरचे ‘क्लास’ कल्चर

logo-latur****प्रदीप******** 

दहावीच्या, बारावीच्या परीक्षेत विशेष गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यास आलेल्या पत्रकारांना आपल्या शैक्षण्ािक संस्थेबरोबरच कोणत्या क्लासमुळे मी चांगले गुण घेऊ शकलो, हे विद्यार्थी आवर्जून नमूद करतात. यात ज्याचे त्याचे श्रेय त्याला दिले पाहिजे, ही वृत्ती दिसून येते. पहाटे पाचपासून रात्री अकरा वाजेपर्यंत लातूरामध्ये क्लासेस सुरू आहेत. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असली, तरी विद्यार्थी व श्ािक्षक यांच्या नात्याची वीण चांगलीच घट्ट आहे.

लातूरची शैक्षण्ािक गुणवत्ता राज्यात व देशात गेल्या काही वर्षांपासून गाजते आहे. ही गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी अनेकांनी आपापल्या परीने हातभार लावला आहे. प्राथमिक शाळेतील श्ािक्षकांपासून ते महाविद्यालयातील प्राध्यापकांपर्यंत, एखाद्या तांडयावर राहणाऱ्या कुटुंबापासून ते टोलेजंग बंगल्यात राहणाऱ्या ऐशआरामी कुटुंबाचेही ही गुणवत्ता वाढविण्यामध्ये योगदान आहे.

clipart1गुणवत्तावाढीचे साधारणपणे श्रेय दिले जाते ते शैक्षण्ािक संस्थांना. ती खाजगी असो अथवा शासकीय. गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून गुणवत्तावाढीसाठी शाळेतील श्ािक्षकाप्रमाणेच घरगुती श्ािकवणी घेणारी मंडळी किंवा स्वत:च्या जागेत काही विद्यार्थ्यांना एकत्रितपणे श्ािकविणारी मंडळी यांचे परिश्रमही डोळयाआड करता येणार नाहीत. एक काळ असा होता की श्ािकवणीला जाणे अथवा कोणी घरी येऊन श्ािकविणे हे कमीपणाचे मानले जाई. आपल्याला एखादी गोष्ट समजत नाही किंवा अभ्यासात एखाद्या विषयात आपण कच्चे आहोत म्हणून त्यासाठी श्ािकवणीची मदत घ्यावी लागते, हे योग्य नसल्याचा समज होता. श्ािकवणीला कुबडयांप्रमाणे समजले जात असे. एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान मिळविण्यासाठी श्ािकवणीची गरज आहे, हे हळूहळू पटायला सुरुवात झाली. गुणवत्तेचे श्रेय कोण घेते, यापेक्षा गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न कोणकोणत्या र्मागाने केले जातात? हे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्याचे शैक्षण्ािक क्षेत्रात जे नाव झाले, त्यात लातूरमधील क्लासेसचे महत्त्व मोलाचे आहे.

साधारणपणे ठरवून श्ािकवणीच्या व्यवसायाकडे जाण्याचा कमी जणांचा कल असे. एखाद्या संस्थेने आपल्या संस्थेतील श्ािक्षकांना खाजगी श्ािकवण्या घेण्यास परवानगी दिली अथवा त्यांच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष केले, म्हणून श्ािकवणर्ीवगाची सुरुवात झाली. कोणताच व्यवसाय जमत नाही, नोकरी मिळत नाही म्हणून उदरनिर्वाहाचे साधन यासाठी अनेक जण क्लासेसकडे वळत असत. व्यवसायावरील निष्ठेने आपल्या शैक्षण्ािक कारकिर्दीत जे यशस्वी होऊ शकले नाहीत, अशा मंडळींनी क्लासेसच्या क्षेत्रात प्रचंड मोठे नाव कमावले. घरोघरी जाऊन श्ािकवणी घेणाऱ्या मंडळींचे आता स्वतंत्र टोलेजंग इमारतीसह महाविद्यालय सुरू झाले आहे. ज्या सुविधा शैक्षण्ािक संस्थेतही नाहीत, अशा सुविधा क्लासेसमध्ये आहेत. विद्यार्थ्यांच्या चप्पल स्टँडपासून ते प्रत्येकास लॉकर देण्याची सुविधाही काही क्लासेसमध्ये आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता नेमकी कशी आहे व त्याच्या वैयक्तिक अडचणी काय आहेत? याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र मानसोपचारतज्ज्ञांची (समुपदेशकांची) सुविधाही काही जणांनी उपलब्ध करून दिली आहे.

_classes-5बालवाडीपासून ते पदव्युत्तर श्ािक्षणापर्यंतचे क्लासेस अतिशय कल्पकतेने चालवले जातात. दहावीच्या व बारावीच्या परीक्षेतील शैक्षण्ािक यशाला गुणवत्ता मानण्याचा कल वाढीस लागत असल्यामुळे या दोन्ही परीक्षांत चांगले यश कसे मिळेल, यावर क्लासेसने चांगले लक्ष केंद्रित केले. लातूरच्या महाविद्यालयांबरोबरच लातूरामध्ये चांगल्या क्लासेसची सोय आहे, यासाठीही राज्याच्या अनेक जिल्ह्याबरोबरच परप्रांतातील विद्यार्थीही लातूरमध्ये श्ािकायला येतात. पालकांना एसएमएस, ईमेल याद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीची अद्ययावत माहिती पाठवण्याची यंत्रणाही अनेक क्लासेसमध्ये आता विकसित झाली आहे.

एखाद्या शाळेत दर वर्षी विद्यार्थ्यांची शैक्षण्ािक सहल निघेलच असे नाही. पण क्लासेसने शैक्षण्ािक सहल काढण्याची प्रथा कदाचित लातूरमध्येच पाळली जात असावी. शैक्षण्ािक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा मानून आता मराठी शुध्दलेखन, व्यक्तिमत्त्व विकास, वक्तृत्व कला, स्पोकन इंग्लिश, मुलाखत तंत्र अशार् वगांनाही चांगलीच मागणी वाढल आहे. बुध्दिमत्तेला चालना देणारे विशेष अभ्यासक्रमही क्लासेसमध्ये श्ािकविले जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून लातूरच्या शैक्षण्ािक विश्वात आता सर्वच बाबतीत स्पर्धा वाढली असून लातूरव्यतिरिक्त आंध्र, कर्नाटक, राजस्थान, आदी प्रांतातील क्लासेसवाले स्पर्धेत उतरले आहेत. एखादी बहुराष्ट्रीय कंपनी स्पर्धेत उतरल्यानंतर छोटया किराणा दुकानदारांची जशी अडचण होते, तशी आता स्थानिक छोटया क्लासेसवाल्यांची अडचण होते आहे. बाजारपेठेत मॉल उतरल्यामुळे गल्लीबोळातील छोटया दुकानदारांनीही आपापले ग्राहक पकडून ठेवण्यासाठी स्वत:मध्ये बदल केले, त्याच पध्दतीचे बदलही क्लासेसमध्ये होत आहेत.

दहावीच्या, बारावीच्या परीक्षेत विशेष गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यास आलेल्या पत्रकारांना आपल्या शैक्षण्ािक संस्थेबरोबरच कोणत्या क्लासमुळे मी चांगले गुण घेऊ शकलो, हे विद्यार्थी आवर्जून नमूद करतात. यात ज्याचे त्याचे श्रेय त्याला दिले पाहिजे, ही वृत्ती दिसून येते. पहाटे पाचपासून रात्री अकरा वाजेपर्यंत लातूरामध्ये क्लासेस सुरू आहेत. पण इतक्या वर्षात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असली, तरी विद्यार्थी व श्ािक्षक यांच्या नात्याची वीण चांगलीच घट्ट आहे.

9422071666

Filed in: १ डिसेंबर २०१३

या लेखावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही.

या लेखावर आपली प्रतिक्रिया द्या.

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)